सुख कशात ? शोधा म्हणजे सापडेल

जगू यात आनंदे

खुप घटना आजूबाजूला नकारार्थी घडताना दिसतय. सतत शेजारी पाजारी यमाची घण्टा वाजतेय.

खरे तर, देल्ही बहोत दूर हैं असे म्हणत म्हणत जिन्दगी जगण्याचा आनंद वेगळाच. पण जिन्दगी छोटी छोटी होत चाललीय आताशा.

कौटुंबिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या ही तर घर घर की कहानी. हे सर्व काही पार पाडून झाल्यानंतर स्वतःसाठी काही वर्षे जगू या असा सर्वसाधारण निसर्गनियम होता. किंबहुना असेच गृहीत धरून तारुण्याच्या उंबरठ्यावर तसे नियोजन प्रत्येकाने केलेले असते, पण म्हणतात ना man proposes God disposes, अगदी तसेच चाललेय, आणि सगळे होत्याचे नव्हते होतेय,

दोन दिवस दुःख करून दुःख कधीच संपणार नसते. परत ज्याचा त्याचा जीवनक्रम सुरू होतोय, नव्हे उद्याच्या जगण्यासाठी तो सुरू करावाच लागतोय.

म्हणूनच आपण एक तर ठरवू शकतो की, भविष्याचे तणाव व भूतकाळ विसरून वर्तमानात जगण्याचा आनंद इतरांना देऊ यात व स्वतः घेऊ यात.

परिस्थिती बदलेल आज नाही तर उद्या एक दिवस निश्चितच आणि अगदीच लगेचच बदलणार नसेल तर आपण आपले विचार तरी नक्कीच बदलू शकतो ना,
जसे आपण करतो ना सगळेच उद्याचे काम आज व आजचे काम आत्ताच. तद्वतच आनंदाची व्याख्याही तशीच ठेवू यात.

सद्य घडीस आनंद देणे हेही आपले एक काम आहे असे झालेय. आजच, आत्ताच आपले सगळे सगळे आनंदी ठेऊ यात. अवघड नाही हे.

आपण स्वतः आनंदी राहूच पण आपल्या आसपासच्या व्यक्तीही आनंदी ठेवू यात तेही आपल्या छोट्याशा प्रेमळ, मृदू संवादातून आणि सकारात्मक कृतीतून.

stay happy

Stay positive

वीणा कुलकर्णी
20.5.2021

मनातले सारे काही

स्मरणातील पुणे भाग 3

*महाराणा प्रतापसिंह उद्याना जवळचे आपटे इडलीवाले*
मुलांना खेळण्यासाठी मध्यवर्ती भागात असलेले महाराणा प्रताप सिंह उद्यान. बाजीराव रोडला टेलिफोन एक्सचेंज समोर.  मुले खेळून दमली की हमखास भूक ठरलेले. 
गाडीवरची भेळ देण्यापेक्षा मी त्यांना या आपटे काकांचे इडली- वडा चटणी द्यायची. चव सुंदर, गरम, स्वच्छता, टापटीप सगळे कसे जिथल्या तिथे. कितीही गर्दी झाली तरी शिस्तीत द्यायचे.  त्यामुळे त्यांचा गोंधळ होत नव्ह्ता. मोठा हिंदलियमचा डबा व त्यात गरम इडल्या,मेदू वडे. चटणी हरबरा डाळ व खोबऱ्याची,हे सगळे घरून घेऊन यायचे.  एकदम टेस्टी.  त्यांची ती पण एक स्पेशालिटी होती. बरीच वर्षे त्यांनी हा व्यवसाय आहे तिथेच केला.  देतानाही स्वच्छ स्टीलची ताटली व कोरडे चमचे द्यायचे
पुढे मुले मोठी झाल्याने आमचेच त्या बागेत जाणे कमी झाले. पण जायचा यायचा रोड नेहमीचा असल्याने तिथे दुसरी गाडी उभी दिसते, पण  आपटे काकांची उभी असलेली मूर्ती नाही,याची उणीव भासते.
वीणा कुलकर्णी20.4.2021

स्मरणातील पुणे भाग 2

माझे बालपण पुणे येथे औंध येथे गेले. १९६० मध्ये राहावयास गेलो. अद्यापही तेथे घर आहेच. त्यावेळी गावठाण व ग्रामीण समजला जाणारा हा भाग आता उच्चभृ गणला जातो. स्मरते ते जुने औंध.
औंधगाव (बॉडीगेटपोलिसलाइनमधीलछोट्यापडद्यावरीलजुनेचित्रपट*
फार पूर्वी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातून एक किंवा दोन चित्रपट दाखवले जायचे. रात्री ९ म्हणजे सुरू व्हायला १० वाजायचे.  हे चित्रपट बॉडी गेट पटांगणावर उघड्या पडद्यावर व्हायचे. पोलिस हेड क्वार्टर म्हसोबा गेट होते. बॉडी गेट पोलिस स्टेशनला लागूनच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्थाने होती.  अधिकारी बंगले व छोटी बैठी घरे (चाळ) अशी बरेच घरे अर्थात बरीच कुटुंबे होती. तेव्हा औंध येथे आत्ता सारखी भाऊगर्दी नव्हती. खूप शांत म्हणून ओळखला जायचा हा भाग.
खरे तर हे चित्रपट पोलिस व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी असायचे. पण आम्ही औंध गावातील स्थानिक मंडळीही हे चित्रपट बघायला जायचो. मजा यायची. फिल्म यायला उशीर व्हायचा, मग technician ते रील जोडणार, प्रोजेक्टर adjust करणार,  साऊंडची खरखर टेस्ट करणार मग चित्रपट सुरू होणार. तोही सलग नाही बघायला मिळणार. अर्धा तास झाला की मध्येच फिल्म तुटायची. ती ५,७ मिनिटे कल्ला, गडबड गोंधळ, शिट्या वाजणार. तीही मजा काही औरच. अशी ४ वेळा फिल्म ब्रेक होऊन ३ तासाचा चित्रपट ४ तास लागायचे संपायला. एक वाजायचा. 
पण त्याकाळी समाधान व आनंद एवढाच की, हे चित्रपट अगदी चकटफू बघायला मिळायचे. ज्वार भाटा, जवानी दिवानी, बरसात, कच्चे धागे, मीलन, सावन भादो, पाठलाग, एक गाव बारा भानगडी यासारखे अनेक गाजलेले चित्रपट आम्ही बघितलेले आहेत. आता गेल्या त्या मजा,त्या काळातील आपली माणसे. कधीही परत न येण्यासाठी.
आज औंध सोडून ४० वर्षाहून अधिक वर्षे सरली,पण लिहिण्याच्या  निमित्याने आठवणी  मात्र ताज्या झाला.

स्मरणातील दिवस – भाग१

*नेहरू स्टेडियम*
पुण्यात लहानाची मोठी झाले. जितकी वर्षे वयाला तितकी वर्षे पुण्यातील वास्तव्यास.
पुण्यात विविध स्पर्धांसाठी नावाजलेले पटांगण म्हणजे नेहरू स्टेडियम. नेहरू स्टेडियमवर क्रिकेट मॅचच होत असतात हा माझा लहानपणी गैरसमज होता.  कारण मोठी मुले- मुली मी सगळ्यात लहान असल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत क्रिकेट खेळायला जाताना मला कधीच नेत नसत.
पुढे मी शाळेत घोष पथकात सिलेक्ट झाले. लेझिम स्पर्धेसाठी सिलेक्ट झाले. या दोन्हीच्या आंतरशालेय स्पर्धा नेहरू स्टेडियम वर आहेत असे शाळेकडून सांगण्यात आले आणि परमोच्च आनंद झाला.एवढ्या मोठ्या स्टेडियमवर स्पर्धा आणि मला खेळायला मिळणार, माझी घोष रॅली तिथे होणार हे खूप भारी वाटत होते.मी इ. सातवीत होते.त्या वर्षी पुण्यातील साधारण २० शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यात आमच्या विमलाबाई गरवारे प्रशालेने प्रथम क्रमांकाची ढाल पटकावली.  
मग नेहरू स्टेडियम आपले वाटायला लागले. काही ना काही निमित्ताने सारखे येणे जाणे झाले. आताही जाऊ शकतो. पण त्यावेळची मजा,  त्यावेळचे कोच – प्रशिक्षक आता नाहीत याची खंत वाटतेच.

माझी ओळख : माझा ब्लॉग(Veena diary)

*सामाजिक पण थोडे मनातले
*कविता
*कथा
* लेख
* विनोद
* कला

जिथे संवाद नाही ते घर नाही. व्यासपीठ नाही. संवाद, संवाद म्हणजे तरी काय एकमेकांनी व्यक्त होणेच ना ?

तुम्ही, मी व आपण सगळेच भेटू यात. रोज रोज. मुक्त संवाद करू यात. मला आवडेल. तुम्हालाही आवडेल. माध्यम एकच आपला आवडता “ब्लॉग”.

Why do this?

  • Because it gives new readers context. What are you about? Why should they read your blog?
  • Because it will help you focus your own ideas about your blog and what you’d like to do with it.

The post can be short or long, a personal intro to your life or a bloggy mission statement, a manifesto for the future or a simple outline of your the types of things you hope to publish.

To help you get started, here are a few questions:

  • Why are you blogging publicly, rather than keeping a personal journal?
  • What topics do you think you’ll write about?
  • Who would you love to connect with via your blog?
  • If you blog successfully throughout the next year, what would you hope to have accomplished?

You’re not locked into any of this; one of the wonderful things about blogs is how they constantly evolve as we learn, grow, and interact with one another — but it’s good to know where and why you started, and articulating your goals may just give you a few other post ideas.

Can’t think how to get started? Just write the first thing that pops into your head. Anne Lamott, author of a book on writing we love, says that you need to give yourself permission to write a “crappy first draft”. Anne makes a great point — just start writing, and worry about editing it later.

When you’re ready to publish, give your post three to five tags that describe your blog’s focus — writing, photography, fiction, parenting, food, cars, movies, sports, whatever. These tags will help others who care about your topics find you in the Reader. Make sure one of the tags is “zerotohero,” so other new bloggers can find you, too.

21 मे, आंतर राष्ट्रीय चहा दिवस

*आंतरराष्ट्रीय चहा दिन *

अहो, कुणी कपबशा शेजारी धुताना किणकिण आवाज होत असला तरी चहा दिल्याचा आभास होतो आम्हाला. इतके चहाबाज आम्ही. तुम्ही म्हणाल “चहा’ हा काही विषय तरी आहे का लिहिण्यासारखा. पण मी म्हणते आहे. नक्कीच आहे.

मंडळी, चहा हा खरे तर नुसते पेय नाही तर ते उत्तम खाद्य आहे गप्पांच, आम्ही खरेच चहा पित नाही तर चहा सोबतच्या गप्पा खातो. वाफाळता चहाची काय मजा असते ना ती फक्त चहाप्रेमींनाच माहित.

चहा पिणे हे खरंतर सगळे घरात असल्याचे लक्षण आहे, म्हटले तर वावगे होणार नाही.

दारी आलेल्या पाहुण्यांना किमानपक्षी चहा दिल्याशिवाय पाठवायचंच नाही हा एक अलिखित नियम. मग ती व्यक्ती काम करणाऱ्या मावशी असोत नाहीतर कोणीही पाहुणा असो. प्रेम व घरोबा व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे चहा. काही नाही आले तरी चालेल पण मुलाला मुलीसाठी व मुलीला मुलासाठी किमानपक्षी चहा तरी करता आला पाहिजे, हे उत्तम आनंदी संसाराचे गमक आहे.

भांडणानंतर जोडीदाराने मुकाट्याने दिलेला चहा आपसूक भांडणं तर मिटवतोच मिटवतो, कारण हा चहा म्हणजे न बोलला गेलेला सॉरी शब्द असतो.

असे हे लोकप्रिय पेय चहा. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. चहा व चहापानामुळे मिळणारा निर्भेळ आनंद, एकरूप होणारी नाती हा खरोखर शैक्षणिक संशोथनाचा विषय होऊ शकतो.

इतक्याशा १५० मिलिग्रॅम चहाचे कपाने कोणाची डोकेदुखी थांबते, तर कोणाची कोटीकोटी व्यवसायातील व्यवहाराची उलाढाल, तडजोडी होतात, एवढेच नाही तर कित्येकांचे अनेक वर्षे व्यक्त न झालेले प्रेमही चहा भेटीत व्यक्त होते. असा हा बहाद्दर जडी, स्थळी, काष्ठी हवाहवासा चहा.

चहा कोणासोबत घेतला तर त्याची अधिक, अधिक आणि अधिक गोडी वाढवतोे , तर कधीतरी कोणाशिवाय एकांतात घ्यायचीच वेळ आली तर तणाव कमी करतो.

अनेकांना जेवू घालणारा सुप्रसिद्ध हॉटेलचा शेफ असो की पेशंटचा जीव वाचवणारा देवदूत नामवंत डॉक्टर असो , कितीही कार्यबाहुल्य असले तरी त्यांना कामाची उर्मी मिळते ती कपातील घोटभर चहातून, हे कबूल करावेच लागेल.

शेवटी काय,चहा पुराण घराघरातून इथून तिथून सारखेच!

भेटून बाहेर जाणार्‍या पाहुण्यांना चहाला पुन्हा एकदा यायचे आग्रहाचे निमंत्रण देऊन केलेला अच्छा बाय केला जातो तोच खरा पाहुणचार!

घरीच रहा, सुरक्षित रहा

चहाचा आस्वाद घेत रहा !

  • आपण जेवतो, खातो, पितो, कामे तर करतोच करतो. पण वाचनाची भूक दुर्लक्षित करतो. त्यासाठी माझा हा ब्लॉग.
  • मी लिहिणार रोज रोज मला आवडणारे तर मला कधी खटकणारेही.
  • कधी कधी रेसिपीज, तर कधी कविता.
  • या तर मग रोज भेटू यात.
  • मला आवडेल लिहायला आणि तुम्हा लोकांना वाचायला.

मी सौ.वीणा कुलकर्णी, पुणे

मी लिहिणार मनातले सारे काही. तेही तुमच्या, माझ्या व सर्वांच्या.

मी आत्तापर्यंत लिहिती नव्हते. पण ठरवले व्यक्त व्हायचे आता. म्हणूनच सामान्य भाषेतून लिखाणाची नुकतीच सुरुवात. भरपूर लोकसंग्रह जमा करण्याची मनस्वी आवड. जनसंपर्क नसेल तर जगणारा तो माणूस कसला ? म्हणूनच तर म्हटले ना वाचाल तर जगाल.